जनावरामध्ये लंपी या रोगाने थैमान घातले असुन रोगावरील लस उपलब्ध करुन देण्याची काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी सध्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर,पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरामध्ये लंपी या रोगाने थैमान घातले असुन त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरावर होत आहे.प्रामुख्याने अहमदनगर जिल्हा या रोगाचे प्रमुख अग्रबिंदु बनला आहे.नगर जिल्हा हा करमाळा तालुक्याच्या लगत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यात होण्याची चिन्ह आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.त्यामुळे या रोगावरील लसीची उपलब्धता लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी करमाळा तालुका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली आहे.
गत दोन वर्षापासुन कोरोना सारख्या महारोगाने शेतकरी राजाचे कंबरडे मोडलेले असताना आता पाळीव जनावरावर आलेले संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.आजच्या वाढत्या महागाईने पाळीव प्राण्यांना संभाळणे अतिशय अवघड झालेले असताना आणखी किती संकटाचा सामना शेतकऱ्यांनी करायचा याचा विचार प्रशासनाने करायला हवा असे शेवटी श्री जगताप यांनी सांगितले.
