Uncategorized

करमाळ्यातून कमळ पन्नास हजाराचे मताधिक्य घेणार-आमदार प्रसाद लाड

करमाळा (प्रतिनिधी )भारतीय जनता पार्टीचे राज्य समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी आज करमाळा तालुक्याचा झंजावती दौरा करून अनेक छोट्या मोठ्या गटांच्या समजूती काढून सर्वांना प्रचाराचा सहभागी करून घेतले.यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य संतोष पाटील व भाजपचे संयोजक सुनील कर्जतकर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन संतोष पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रचाराला सुरुवात झाली.यावेळी आदिनाथ चे चेअरमन संतोष पाटील यांनी सीना नदीकाठच्या चाळीसगावातून किमान दहा हजाराचे मताधिक्य देणार व कमळाचे काम करणाऱ्याचे सांगितलेयानंतर बागल गटाचा मेळावा घेऊन आता मकाई कारखान्याला मदत केली असून रश्मी बागल वर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी कमळाला मताधिक्य द्यावी अशी आवाहन केले.बागल गटाची किंग मेकर विलासराव घुमरे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण यशवंत परिवार कमळाच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून वैद्यकीय मदत कक्ष व सर्वसामान्यांच्या प्रश्नासंदर्भात झालेली मदत याची प्रशंसा करून याचाही फायदा या निवडणूक होणार याचा विश्वास व्यक्त केलाएकंदरीत आज आमदार प्रसाद लाड यांनी दिवसभर तालुक्यातील अनेक महत्त्वांच्या नेते मंडळीची भेटीगाठी घेऊन सर्वांना प्रचारात सक्रिय केले आहे.यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले कीदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे कणखर नेतृत्व देशाला मिळाले म्हणून आज हिंदुस्तान सर्व जगात आपला ठसा उमटून आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीक रमाळा तालुक्यातील आमदार संजय मामा शिंदेमाजी आमदार जयवंतराव जगताप भाजप प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटेभा जपचे नेते विलासराव घुमरे या सह तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करत असल्यामुळे करमाळा तालुक्यातून पन्नास हजाराची मताधिक्य मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!