सर्वसामान्यांचे हिताचे निर्णय घेणाऱ्या मोदींनाच जनतेची पसंती खासदार.निंबाळकर लाखोंच्या फरकाने निवडून येतील- ॲड. नितिनराजे बॉबीराजे राजेभोसले. जिंती
करमाळा प्रतिनिधी- लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोलताना पश्चिम भागातील आमदार. संजयमामा यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बॉबीराजे ऊर्फ आदिनाथराजे राजेभोसले यांचे चिरंजीव माननीय ॲड. नितीनराजे राजेभोसले यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले असुन पश्चिम भागातुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जास्तीचे मतदान मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. एकीकडे रणजितसिंह निंबाळकराचे विकासाचे व्हीजन आहे तर विरोधी उमेदवाराकडे खुर्चीचा हव्यास आहे. त्यामुळे जनता ओळखून आहे. देशात मोदींनी केलेली प्रगती तुम्ही आम्ही पहात आहोत. मोदींनी सर्वसामान्याची मने जिंकली आहेत. अन्न पाणी आणि निवाऱ्यासह त्यांनी जनतेच्या आरोग्यावर सुद्धा विकासात्मक व दर्जेदार कामे केली आहेत. आम्ही नामदार अजितदादा पवार साहेब आणि आमदार संजयमामा शिंदे यांचे आदेशाचे पालन करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच निवडून आणू. असे वक्तव्य ॲड. नितीनराजे राजेभोसले जिंती यांनी केले आहे.
