करमाळासकारात्मक

घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या कुटुंबाचा सर्वे करा- अमोल दुरंदे *

करमाळा प्रतिनिधी सन  2019 मध्ये पंतप्रधान आवास योजनेचा(ड फॉर्म )ऑनलाईन सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीचे आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि ग्रामपंचायतीचे शिपाई यांनी आपआपल्या गावातील पंतप्रधान आवास योजनेसाठी इच्छुक असलेल्या सर्व अर्जदारांच्या प्रत्यक्षात घरी जाऊन ऑनलाईन अर्ज भरले होते. परंतू त्यावेळेस जे लोक उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेले होते. ते लोक या लाॅकडाऊनमुळे पुन्हा गावी येऊन वास्तव्य करत आहेत. असे बरेच इच्छुक अर्जदार या सर्वेपासून वंचित राहिले आहेत. यामध्ये बरेच भूमिहीन आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व लोकांचा विचार करुन सरपंच परिषदेच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते की, कृपया पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचा पुन्हा सर्वे करण्यासाठी मुदतवाढ मिळावी. अशी मागणी करमाळा तालुका सरपंच परिषद अध्यक्ष, मा.श्री. डाॅ. अमोल दुरंदे यांनी मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा यांना लेखी निवेदन देऊन केली आहे..*

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group