भारत डाळ योजनेचा देवळाली व पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा- राहुल कानगुडे युवा सेना तालुकाप्रमुख
करमाळा प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दसरा दिवाळीसाठी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला साठ रुपये किलो दराने प्रत्येकी पाच किलो डाळ मिळणार असून शिवसेनेच्या युवा सेना कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती शिवसेना युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी दिली आहे. या डाळ वितरणाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्या हस्ते शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 18 ॲाक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता देवळाली येथे युवा सेना संपर्क कार्यालयात होणार असल्याचे राहुल कानगुडे यांनी सांगितले. डाळीचे किंमती प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्यांना सणाला डाळ मिळावी म्हणून नाफेडची वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड घेऊन आले की पाच किलो प्रति किलो साठ रुपये प्रमाणे दिली जाणार आहे. डाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर पाच सदस्यांना 25 किलो डाळ खरेदी करण्यात येणार आहे तीन ते चार दिवसात हरभऱ्याची डाळ उपलब्ध करण्यात आली असून देवळाली व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी केले आहे.
