करमाळा

मकाई साखर कारखान्याच्या निवडणुक मतदानाला सुरुवात बागलगटाविरुध्द परिवर्तन पॅनल असा सामना रंगला

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नऊ जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली असून पोथरे येथे पंचायत समितीच्या माजी सभापती भाग्यश्री शिंदे खटके यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मकाई सहकारी सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये बागल गटाविरुद्ध प्रा. रामदास झोळ सराचे मकाई परिवर्तन पॅनल असा सामना रंगला आहे. यंदाच्या निवडणुकीत बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांनी या निवडणुकीमध्ये उमेदवारी घेतली नसून बागल गटाच्या कार्यकर्ताविरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढाई रंगली असल्याने बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्याची यंत्रणा कामाला लागली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आठ जागा बागल गटाने मिळवल्या असून नऊ जागेसाठी मतदान होत आहे.गाव पातळीवरची बागल गटाची कार्यकत्याची यंत्रणा मतदान करण्यासाठी सरसावले असून जास्तीत जास्त मतदान करून घेऊन बागल गट विजयाची पताका उभारण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.तर दुसरीकडे मकाई परिवर्तन पॅनल त्यांना शेवटचे दोन दिवस प्रचाराला मिळाल्याने डिजीटल बॅनर सोशल मीडियामार्फतच आधुनिक तंत्राने लोकांना त्यांनी आवाहन केले आहे त्यामुळे घरोघर बांधावर जाऊन केलेला प्रचार केला असल्यामुळे बागल गट सर्व जागी विजय मिळवुन एकहाती सत्ता मिळवणार असल्याचा दावा बागल गटाकडुन केला जात आहे तर दुसरीकडे आम्हाला माजी आमदार जयवंतराव जगताप  यांचा पाठिंबा मिळाला असून सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्या पाठबळावर परिवर्तन पॅनलचे सर्व जागी यश मिळवुन मकाई कारखान्यात आम्हाला काम करण्याची संधी मिळेल असा  विश्वास प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!