मकाई सहकारी साखर कारखाना परिवर्तंन पॅनलचे प्रा .रामदास झोळ यांनी वांशिबेत केले मतदान यशस्वी होण्याचा व्यक्त केला विश्वास
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्यावर आतापर्यंत बागल गटाची एक हाती सत्ता असून आतापर्यंत एकदाच निवडणूक झाली असून आतापर्यंत बिनविरोधची परंपरा कायम होती या परिस्थितीमध्ये शेतकरी कामगार कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा प्रथमच प्राध्यापक रामदास झोळ यांनी मकाई परिवर्तन पॅनल तयार करून निवडणुकीत आपले उभा केले आहे या निवडणुकीसाठी त्यांना माजी आमदार जयवंतराव जगताप स्वाभिमानी शेतकरी संघटना .शिंदे समर्थक वामनदादा बदे यांचे पाठबळ मिळाले आहे.मकाई परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना जनता नक्कीच निवडुन देईन आम्ही शेतकरी कामगार सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत राहु असा विश्वास प्रा .रामदास झोळ यांनी व्यक्त केला आपल्या राहत्या गावी त्यांनी मतदान करुन आपला हक्क बजावला आहे.
