करमाळा युवा सेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निषेधार्थ सुभाष चौक येथे स्वाक्षरी मोहिम राबवून केला कोश्यारी यांचा निषेध
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. असेच वादग्रस्त वक्तव्य त्यांनी काल मुंबई व महाराष्ट्राच्या बाबतीत केले असल्याने त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ करमाळा तालुका व शहर युवा सेनेच्या वतीने सुभाष चौक येथे निषेध स्वाक्षरी मोहिम राबवून युवा सेना तालुका प्रमुख राहुल कानगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले
यावेळी बोलताना कानगुडे म्हणाले की, राज्यपाल हे एक संविधनिक पद असून त्या पदाचा मान, प्रतिष्ठा राखणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. परंतु आज तगायत त्यांनी कशाचेही भान न ठेवता भाजपा प्रवक्ता असल्यासारखे आपली मते जाहीर करून आपण महाराष्ट्रात राज्यपाल पद हे फक्त प्रादेशिक पक्ष संपविणे, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करणे, भाजपाच्या बाजूचे एकतर्फी निकाल देणे याबाबत दिसून येत होते. परंतु त्यांनी काल मुंबई च्या बाबतीत केलेले वक्तव्य हे मुंबईसह महाराष्ट्र साठी हौतात्म्य पत्करलेल्या जनतेच्या भावना दुखावणारे केले असून मराठी माणसांची अवहेलना जर कोणी करणार असेल तर मग तो कोणत्याही सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती असो त्याला त्याच भाषेत उत्तर देण्यास शिवसेना युवा सेना समर्थ आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल यांना जर एवढा गुजराती व राजस्थानी लोकांचा पुळका असेल व तर त्यांनी तात्काळ महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडून द्यावे किंवा केंद्र सरकारने त्यांचा महाराष्ट्राचा पदभार काढून घ्यावा आणि महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा द्वेष बंद करावा अन्यथा यापुढे शिवसैनिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले अशी संतप्त प्रतिक्रिया कानगुडे यांनी दिली.
यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख मयूर यादव, शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, समीर हलवाई, करण काळे, सुधीर आवटे, विनोद पडवळे, सचिन कानगुडे, करण साखरे, नागेश बोराडे, अमोल राखुंडे, विशाल चोपडे, रोहन कानगुडे, अक्षय कानगुडे, लखन पोपट शिंदे, अश्रू आवटे आदी युवा सैनिक उपस्थित होते
