करमाळासकारात्मक

करमाळ्यात नगरपालिकेकडुन पाणीपुरवठा होण्यास विजेची अडचण आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात पाण्यामुळे मोठी अडचण निर्माण होत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे पाण्याची ताराबंळ निर्माण होत आहेे. याबाबत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जेऊर येथुन दहिगाव येथे होणारा वीज पुरवठा खंडित न होता अखंड वीज मिळावी याकरता लक्ष देऊन करमाळा शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी येथील नागरिकाकडून होत आहे हा प्रश्न नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये येथून लाईटच्या प्रश्नामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे योग्य दाबामुळे न झाल्याने अडचण निर्माण होऊन कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहेे. त्यामुळे याबाबत नगरपालिकेला विचारले असता लाईटच्या पुरवठा खंडीत होत असल्यामुळे वीजेच्या प्रश्नामुळे पाणी येण्यास अडचण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.याबाबत जेऊर वीज वितरण कंपनीला त्यांनी अखंडित वीज पुरवठा बाबत पत्र दिले असून अखंड वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे वारंवार वागणी करूनही दखल न घेतल्यामुळे आता याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष घालून वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा अखंड राहावा याकरिता महावितरण कंपनीला जेऊरला पत्र देऊन नागरिकांना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करून दिलासा द्यावा अशी करमाळा वासियांची मागणी आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group