करमाळा शिवसेना युवा सेनेच्या वतीने महिलांसाठी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व व युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्या वतीने करमाळ्यातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यावेळी गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना युवासेना दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त किल्ला विभाग येथे भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याचप्रमाणे यावर्षीही दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा या विशेष मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खेळ पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत महिलांचे विविध मनोरंजनाचे खेळ सुरक्षित वातावरणात घेतले जाणार आहेत तसेच सदर कार्यक्रम वेळी फक्त महिलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. खेळ पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्या व उपस्थित राहणाऱ्या महिलांना भरघोस बक्षीसे वितरीत केली जाणार आहेत. लकी ड्रॉ द्वारे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादित कुपन ठेवण्यात येणार असून ज्या महिला कार्यक्रम स्थळी लवकर येतील अशा महिलांनाच कुपन देण्यात येणार असल्याचे ही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.
