करमाळा शहर व तालुक्यात १८ सप्टेंबर रोजी ५६ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात १८ सप्टेंबर रोजी ३२१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ३१ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. करमाळा शहरात ११४ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये. ३ कोरोनाबाधीत यामध्ये किल्ला विभाग १ महिला, महेंद्रनगर १ पुरुष, १ महिला , ग्रामीण भागात ५३ कोरोनाबाधित यामध्ये धगटवाडी १ पुरुष ,फिसरे १ पुरुष,पुनवर १ पुरुष, लिंबेवाडी १ पुरुष, जेऊर ४ पुरुष, ५ महिला ,भोसे १ पुरुष ,हिसरे १ पुरुष केम २ पुरुष नेरले ५ पुरुष, ५ महिला ,रावगावमध्ये सर्वाधिक १३ पुरुष, १३ महिलांचा समावेश आहे. ८१ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १००६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५५९ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची १५९० वर जाऊन पोहोचली आहे.
