Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

कांदा निर्यात अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान -हनुमंत मांढरे पाटील

करमाळा.प्रतिनिधी   केंद्र सरकारने कांदा निर्यात अचानक बंद करून जगाचा पोशिंदा आसणारा शेतकरी याची आर्थिक पिळवणूक केली आहे .मोदी सरकार हे हिटलर शाही पद्धतीने वागत आहे जगावर कोरोना महामारीचे एवढे मोठे संकट असताना महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला मदत करायचे सोडून भाजप  सरकार मात्र गल्लीच्छ राजकारण करत आहे. शेतकरी वर्गाची पिळवणूक करीत आहे याचाच निषेध म्हणून करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार समीर माने साहेब यांना निवेदन व कांदे भेट देण्यात आले *मोदीचे धोरण शेतकर्यांचे मरण* आशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा ता. कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील, शहर अध्यक्ष शिवराज जगताप, शहर उपाध्यक्ष आझाद शेख ,ॲड सविताताई शिंदे महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला गोवर्धन चवरे तृप्ती साखरे तालुका अध्यक्ष नलिनीताई जाधव शहरअध्यक्ष राजश्री कांबळे आशपाक जमादार  श्रीकांत साखरे राजू शेख मेजर कांबळे सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group