अखिल भारतीय काँग्रेस आय करमाळा कार्यालयाच्या 24 एप्रिल रोजी उद्घघाटन कार्यक्रमास महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांनी उपस्थित रहावे- प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काॅग्रेंस आय करमाळा तालुका कार्यालयाचा उद्घघाटनाचा संमारंभ कार्यक्रमास महाविकासआघाडीतील सर्व पक्ष पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस आय संपर्क कार्यालयाचा उद्घघाटन समारंभ 24 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करमाळा येथे कसबा पुणे येथील आमदार रविंद्र भाऊ धंगेकर यांच्या शुभ हस्ते काॅंग्रेस आय सोलापुर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नामरत्न काॅम्पलेक्स मेनरोड करमाळा येथे होणार आहे. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आय उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व संभाजी बिग़्रेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन काॅंग्रेस आय करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले.