विलासराव घुमरे सरांचे कार्य युवा पिढीसाढी प्रेरणादायी असुन त्यांचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करणे काळाची गरज -पत्रकार दिनेश मडके
करमाळा प्रतिनिधी विलासराव घुमरे सर म्हणजे प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शुन्यातून विश्व निर्माण करून यशस्वी जीवन कसे जगावे यांचे उत्तम उदाहरण असुन युवापिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी असे मत पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळांचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या ६८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंत परिवाराच्यावतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ६ / २ / २०२३ रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील हे होते. गुरुवर्य विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक पवनपुत्रच्यावतीने काढण्यात आलेल्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पाटील ,उद्योजक आशुतोष घुमरे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे प्रमुख विजयराव बिले सर, नगरसेवक डॉक्टर अविनाश घोलप, डॉक्टर रवीकिरण पवार,मराठी विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप मोहिते, हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रा. अनिल साळुंखे सर, उपप्राचार्य संभाजीराजे किर्दाक सर, प्राध्यापक व्यवहारे सर प्राध्यापक प्रमोद शेटे, प्राध्यापक ओम साळुंखे प्राध्यापक थोरवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील एन सी सी, एन एस एस च्या विद्यार्थ्यानी व यशवंत परिवारातील १०५ सदस्यानी रक्तदान केले. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, नूतन प्राध्यापक कक्षाचे( स्टाफरूम) उद्घघाटन ग्राहक सेवा केद्रांचे उद्घघाटन असे विविध कार्यक्रम संप्पन झाले. या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले .वृक्षारोपणासाठी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थीनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अनेक व्यक्तीच्या जडणघडणीत घुमरे सराचा सिंहाचा वाटा जाणवल्याचे स्पष्ट केले. विलासराव घुमरे सर म्हणजे अनेकजनांच्या जीवन समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व आहे. तुम्ही तुमच्या जीवनात अशा लोकांशी मैत्री करा की ते घुमरे सरांसारखे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील असे सांगितले.सतत संघर्ष करणारे व सतत दुसऱ्यांना मदत करणारे असे घुमरे सर आहेत .या आधुनिक युगात विज्ञानाच्या वाटेने जावा, पण साहित्याचा अभ्यास जरूर करा कारण साहित्यातून माणूस घडतो त्यांनी मनोगतातून सांगितले. यशवंत परिवाराचे आधारवड विद्या विकास मंडळाचे सचिव मार्गदर्शक विलासराव घुमरे सरांचा वाढदिवस यशवंत परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात व आनंदात विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला .
