करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या सह कक्षप्रमुख तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाऊडेंशन समन्वयकपदी शिवकुमार सुर्यकांत चिवटे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या सह कक्ष प्रमुख तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समन्वयकपदी चिवटे मिठाईचे मालक शिवकुमार सुर्यकांत चिवटे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र कल्याण पश्चिम मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. विश्वनाथ भोईर, श्री.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख,महाराष्ट्राचे आरोग्यदुत श्री. मंगेश (भैय्या) चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख (महाराष्ट्र राज्य) श्री. रामहरी राऊत सर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.यावेळी ओंकार(शेठ)ढाळे,प्रतीक(शेठ)गांधी व दुर्गेश कोकीळ उपस्थित होते.
