Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांगडी घागर मोर्चा काढण्यात येईल नगरसेविका स्वातीताई फंड यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन*

*करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांगडी घागर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदन देतेवेळी रूपाली यादव, शशिकला मांगले, कोमल हसीजा,सोनिया राठोड जया कोरपे पूजा पंडित ज्योती भोसले रेश्मा आवटे,शुभांगी थोरात मनिषा जगदाळे सुमय्या काझी संगीता दारूवाले प्रिया घुमरे वेणु राणे ,शियाळ भाभी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.उजनी धरण १००% भरलेले असताना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे करमाळा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे . एक दिवसाआड पाणी सुरू होणे गरजेचे असताना चार दिवसाला एकदा पाणी येत कधी पाईपलाईन खराब झाली आहे .तर कधी ‌ लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे . अशी कारणे दिले जात आहे ‌ नाचता येईना अंगण वाकडे ‌ अशी परिस्थिती झाली आहे . करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळ दसरा दिवाळी सण तोंडावर असतानाही पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी प्रशासन यांचा कारभार रामभरोसे चालू असून करमाळा नगरपालिकेला कुणी वालीच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.. नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात.बिलापोटी दिलेल्या रकमेचा वापर कशासाठी केला असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ पाणीपुरवठा सुरू करायचा नावाखाली रोज हजारो रुपयांची बिले नगरपालिकेतून वसूल केली जातात. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्याचप्रमाणे शहरात डेंगूची प्रचंड साथ पसरली असून डासाचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जंतुनाशके वापरली जात नाहीत. नगरपालिकेचे फॉगिंग मशिन बंद आहे ‌.आरोग्याचे ठेक्याचे बिल मात्र निघत आहे.पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या सर्व प्रश्नांवर जनता संतप्त झाली असून . लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी नगरपालिका प्रशासनाला बांगडी भरण्याचा घागर मोर्चा काढला जाईल असा इशारा नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group