वडीलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून संघर्षातून यश मिळवुन सॉफ्टवेअर इंजिनियर बनुन कु. मनाली पांढरे केली वडील स्व. संजय पांढरे यांची इच्छा पुर्ण
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील मा.राज्यमंत्री स्व. दिगंबरराव बागल मामा यांचे विश्वासू चालक असलेले स्वर्गीय संजय पांढरे यांची कन्या मनाली संजय पांढरे हिने वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षातून यश मिळवले आहे.आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून एच बी सी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून तिची निवड झालेली आहे. वडील स्वर्गीय संजय पांढरे यांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या करिअरला प्राधान्य दिले होते. .दिवस रात्र एक करून स्वतःचा वाहतुक व्यवसाय करून काबाडकष्ट केले म्हणून त्याचाच भाग म्हणून आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून मनाली संजय पांढरे हिने उर्वरित दोन वर्षे शिक्षण अर्धवट न सोडता पूर्ण करून विशेष प्राविण्य मिळवत यश मिळवले आहे तिच्या यशामध्ये मनालीने घेतलेली मेहनत कारणीभूत असून आई श्रीमती रेखाताई संजय पांढरे काका महेंद्र कोराळे आत्या शिलाताई कोराळे लातुर यांनी शिक्षणास विशेष सहकार्य केले. भाऊ चि. यश संजय पांढरे काका बाळासाहेब पांढरे सचिन पांढरे आजी रंजना पांढरे आजोबा कोंडेकर मामा मावशी यांचे विशेष प्रोत्साहन तिला मिळाल्यामुळे मनालीने हे यश मिळवले आहे. दुःखाला कवटाळून न बसता आजच्या युवा पिढीला एक संदेश देत मनालीने आपल्या दुःखावर पांघरून टाकून कर्तव्याची बाजू सांभाळत वडीलाचे इंजिनिअर बनण्याची इच्छा स्वप्न पूर्ण केलेली आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली सकल जैन समाज चालक-मालक संघटना करमाळा यांच्यावतीने तिचे अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
