दसरा मेळाव्याला नारायण गड येथे जाण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांच्याकडून 500 वाहनांना मोफत इंधनाची सोय
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगेसोयरेची अंमलबजावणी होऊन समाजाला न्याय मिळावा याकरिता मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारायणगड जि बीड येथे सकल मराठा समाजाचा दसरा मेळावा संपन्न झाला .या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी करमाळा तालुक्यासाठी समाजबांधवाना नारायण गड येथे उपस्थित राहण्यासाठी पाचशे गाड्यांना मोफत इंधन देण्याचे काम त्यांनी केले आहे..मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळे सोयरेची अंमलबजावणी करुन सरकारने न्याय द्यावा या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजबांधवाबरोबर अनेक बहुजन बांधव जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते .त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या या लढाईत खारीचा वाटा उचलावा या भावनेतून म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे . संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देऊन मुंबईला जाण्यासाठी तीनशे वाहनांच्या मोफत इंधन देण्याचे काम केले होते त्याचबरोबर सोलापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शांतता रॅली काढण्यात आली.याकरीता करमाळा तालुक्यातील समाज बांधवांना जाण्यासाठी अडीचशे चार चाकी व शंभर दुचाकी गाड्यांना मोफत इंधन देण्याचे काम प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी होऊन दातृत्वाने मोफत इंधन देण्याचे काम करणाऱ्या प्रा.रामदास झोळ सर यांचे मराठा समाजाकडून कौतुक होत आहे.
