भारतीय जनता पार्टी ग्रामीण तालुका अध्यक्षपदी मकाईचे संचालक सचिन बापू पिसाळ यांची निवड
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी पांगरे गावचे माजी उपसरपंच मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सचिन बापू पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड सोलापूर येथे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते पत्र देऊन शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करून करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या सहकाऱ्यांने युवकाचे संघटन करून करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवणार असल्याचे सचिन पिसाळ यांनी सांगितले. सचिन पिसाळ पांगरे गावचे माजी उपसरपंच असून मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक म्हणून काम करत आहेत सचिन पिसाळ यांनी ग्रामीण भागामध्ये चांगले काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टी करमाळा ग्रामीण तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजप महायुती सरकारने लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज माफी योजना, वयोश्री योजना, बांधकाम कामगार कल्याण योजना, शेतकरी पेन्शन योजना यासारख्या आणि कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोक कल्याणकारी योजना करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये गावागावात भाजपच्या शाखा काढून करमाळा तालुका भाजपामय करणार असल्याची सचिन पिसाळ यांनी सांगितले. त्यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यातील विविध स्तरातून होत आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे युवा नेते मा. दिग्विजय बागल यांनी सत्कार करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन मा. दिनेश भांडवलकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती मा चिंतामणी दादा जगताप, ॲड. दत्तात्रय सोनवणे, बरडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
