सामाजिक कार्यकर्त श्रेणिकशेठ खाटेर यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कमलाई देवी गौरव पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचामाळ ता.करमाळा येथे श्री कमलादेवी माता नवरात्र उत्सवा निमित्त करमाळा फेस्टिवल चे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार देऊन सलमान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी 2024 चा श्री जगदंबा देवी बहू उद्देशीय संस्था व महप्रसाद वाटप मंडळ, अन्न छत्र मंडळ यांच्या वतीने *राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार*तपश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांना त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे यांनी श्री श्रेणिक शेठ खाटेर यांच्या आज पर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे अन्न छत्र मंडळाचे सदस्य यांचे सह एस. वी. मॉल चे जयराज कदम, योगेश सोरटे , मा. सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र फलफले, अक्षय सोरटे , दीपक थोरबोले, बाळासाहेब नरारे सर,लष्कर सर,दत्ता रेगुडे , संतोष वारे , आशिष बोरा , चंद्रकांत कालदाते, विजय बरिदे यांचे सह रांगोळी स्पर्धेचे विजेते , डान्स स्पर्धेचे विजेते , यांचे सह त्यांचे सर्व पालक व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन करतांना शेखर जोगळेकर यांनी श्रेणिकशेठ खाटेर यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
