संभाजी ब्रिगेड जेऊर शाखेचे वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमा सप्रेम भेट
प्रतिनिधी संभाजी ब्रिगेड जेऊर यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शिवराय फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमा चिखलठाण वरकटणे व वांगी-1 या तलाठी कार्यालयास प्रतिमा भेट दिल्या तसेच आतापर्यंत १००० शासकीय कार्यालयास व शासकीय अधिकाऱ्यास भेट देण्यात आल्या. बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा लिहण्याचा व मतांचा अधिकार मिळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत शिका ,संघर्ष करा व संघटित व एकजुटीने कार्य करा असे बाबासाहेबांचे विचार संभाजी ब्रिगेडने तरुणांच्या मनामध्ये रुजवले संभाजी ब्रिगेड मुळे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये महापुरुषांचे विचार हे घराघरात पोहचत आहेत व आत्ताच्या आधुनिक युगामध्ये बाबासाहेबांचे स्टेटस तरुणांच्या मोबाईल मध्ये दिसत आहेत ते संभाजी ब्रिगेड मुळे
यावेळी उपस्थित आर के वळेकर मंडल अधिकारी जेऊर,ए.जे.डोणे तलाठी चिखलठाण,वरकटणे,एम.वाय.हेड्डे तलाठी वां-१
तसेच पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, निलेश पाटील ,संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष, अतुल निर्मळ, विश्रनाथ सुरवसे , रासपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा, शारदाताई सुतार ,शरद वाघमोडे ,रणजीत कांबळे, आजिनाथ माने, सागर बनकर ,सुहास शिंदे, पप्पू कांडेकर, अभिजीत म्हमाणे, महेश जगताप, आजिद उपादे, इत्यादी उपस्थित होते.
