आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शना खाली प्रा.विलासराव घुमरे सर,डाॅ.वसंत पुंडे,ॲड.दिपक देशमुख यांची नवीन प्रशासकीय मंडळात नियुक्ती.
आदिनाथचे कारखान्याचे जुने प्रशासकीय मंडळ बरखास्त…
करमाळा प्रतिनिधी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागील महिन्यात करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे व पुन्हा एकदा सहकारी तत्वावर चालला पाहिजे यासाठी अकलूज ला सर्व गटांची मिटिंग बोलावली होती व आदिनाथ वर मार्च महिण्याखेर होणाऱ्या कारवाई विषयी सर्व सभासदांना अवगत करून पुढे असणाऱ्या धोक्यांची कल्पना दिली होती व आपण स्वतः यात जातीने लक्ष घालू व आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावरच चालला पाहिजे यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यावर तालुक्यातील प्रमुख गटांच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक विचार व्यक्त करून सहमती दर्शवली होती व 250 कोटी रु कर्जाच्या खाईत असणारा आदिनाथ वाचवण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आ.रणजितसिंह यांनी त्यावेळी दिलेल्या धोक्याची कल्पना खरी ठरत मार्च महिन्यात आदिनाथ वर पहिल्यांदा NCDC व नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ताबा घेण्याची कारवाई केली होती व आदीनाथ कारखान्याचा गत हंगाम ही सुरळीत चालू होऊ शकला नव्हता.करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची कुचंबणा होत होती ऊस गाळप होत नव्हते ,आदीनाथ च्या जुन्या प्रशासकीय मंडळाची मुदत संपली होती व त्यांना नव्याने मुदतवाढ दिलेली नव्हती यामुळे आदिनाथ च्या प्रशासकीय कारभारात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काही बदल करणे गरजेचे होते हे लक्षात घेऊन आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन सांगितले प्रमाणे कारखान्याच्या प्रशासकीय मंडळात बदल केला आहे. जुन्या प्राशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकारी श्री बेंद्रे यांची नियुक्ती कायम ठेवून उर्वरीत अशासकीय प्रा.विलासराव घुमरे सर,डाॅ.वसंत पुंडे,ॲड.दिपक देशमुख यांची नवीन प्रशासकीय मंडळात नियुक्ती. या तीन नवीन 3 सदस्यांची नेमणूक दि.16.03.2024 रोजीच्या आदेशानुसार मा.प्रादेशिक सह संचालक साखर यांनी केलेली आहे.
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे आदिनाथ कारखान्याशी भावनिक नाते आहे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आदिनाथ सह साखर कारखाना सहकारी तत्वावर कायम ठेवून आर्थिक संकटातुन बाहेर काढण्यासाठी पहिले पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा उभारी येण्याची चिन्हे असुन तसा सभासदांमधुन विश्वास व्यक्त होत आहे.
