करमाळ्याचे सुपुत्र मदार चित्रपटाचे निर्माते मंगेश बदर अभिनेत्री अमृता अग्रवाल यांचा बागल गटाच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी- मदार चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते करमाळा तालुक्यातील घोटी गावचे सुपुत्र श्री मंगेशजी बदर यांच्यासोबत अभिनेत्री करमाळा भूमीकन्या अभिनेत्री अमृता अग्रवाल या टीमचा पुणे आंतरराष्ट्रीय फेस्टिवल मध्ये सलग पाच पुरस्कार मिळाल्याबद्दल मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय दिग्विजय भैया बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी मोबाईल वरून सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चित्रपट निर्माते मंगेश बदर यांनी लोकनेते स्वर्गीय दिगंबर मामा बागल यांनी सन २००२ मध्ये घोटी येथे तात्कालीन जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय विलास काका राऊत यांच्या शिफारशीनुसार दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा छावणी जनावरांसाठी सुरू केली. त्यावेळी मी वयाने लहान होतो तो प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला आणि मदार चित्रपटाची संकल्पना मला त्या एका क्षणामुळे सुचली. करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागावरती आणि त्या प्रश्नावरती एखादी आर्ट फिल्म बनवावी असे मला वाटले, त्यातून मदार चित्रपटाची निर्मिती झाल्याच नम्रपणे श्री बदर यांनी सांगितले. या चित्रपटातील सर्व शूटिंग हे केम घोटी आणि करमाळा परिसरात झालेले असून ग्रामीण भागातील सर्व कलाकार आहेत. व ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये शिकलेले आहेत हेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मी करमाळ्यामध्ये मोबाईल व्यावसायिक म्हणून सुरुवातीला काम केलं महाविद्यालयीन जीवनात युवा महोत्सवामध्ये मी सहभागी होतो. आणि त्यानंतर अहमदनगर येथे शिक्षणाला गेल्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूट चा अभ्यासक्रम पूर्ण केला. व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर आता स्वतःच मी मदार नावाचा चित्रपट बनवला असून या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाकडून कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकन दिले जाईल, आणि त्यानंतर हा चित्रपट खऱ्या अर्थाने रिलीज होईल असे श्री बदर यांनी सांगितले. यावेळी दिग्विजय बागल यांनी करमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून चित्रपट कलाकार निर्माते आणि दिग्दर्शक तयार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. व अशा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करू त्याचाच एक भाग म्हणून येत्या 9 ते 13 मार्च दरम्यान कृषी महोत्सवाच्या काळात कला महोत्सव नावाचा कार्यक्रम असून हे व्यासपीठ नवयुवकांना आपल्या वेगवेगळ्या कला व कौशल्य यांना संधी प्राप्त करून निश्चितपणे देईल, असा विश्वास व्यक्त केला अमृता अगरवाल आणि सहकलाकारांचंही त्यांनी अभिनंदन केलं आणि करमाळा तालुक्याला आपण अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. मराठी चित्रपटाला नामांकनातच सुरुवातीलाच पाच पुरस्कार मिळणे ही एक विक्रमी गोष्ट असल्याचं श्री बागल यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे पत्रकार अण्णा काळे नगरसेवक अल्ताफ तांबोळी,आशुतोष घुमरे,विकास रोकडे, यासह सर्व मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले.
