छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी बैठकीचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदू बांधवाचे , बहुजनाचे श्रद्धास्थान असुन 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्यां शिवजयंतीनिमित्त तो साजरा करण्या संबंधी विचार विनिमय करण्यासाठी गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी दत्तमंदिर विकासनगर करमाळा येथे सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे तरी करमाळा शहर तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.करमाळा शहर व तालुक्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव करमाळा शहरांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतात.
