दिग्विजय बागल यांनी वीट गटातून जिल्हा परिषद निवडणुक लढवावी – आनंदकुमार ढेरे
कोर्टी प्रतिनिधी :-
दिग्विजय बागल यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक वीट गटातून लढवावी अशी मागणी करमाळा बाजार समितीचे संचालक आनंद कुमार ढेरे यांनी केली आहे.सध्या करमाळा तालुक्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.यामध्ये करमाळा नगर परिषद, मकाई सहकारी साखर कारखाना,आदिनाथ सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात निवडणुकांचे वारे चांगलेच रंग धरू लागले आहे. यामध्ये प्रत्येक गटाकडून वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.अशातच बाजार समितीचे संचालक ढेरे यांनी वीट गटातून दिग्विजय बागल यांनी जिल्हा परिषद उमेदवारी करीता आर्जव मागणी केलेली आहे. वीट जिल्हा परिषद बागल गटासाठी अतिशय अनुकूल असून बागल गटाला माननारा वर्ग खूप मोठा असल्याने दिग्विजय बागल या गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ शकतात असा विश्वास ढेरे यांनी व्यक्त केला आहे हा गट कायमच बागल गटाच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे या गटातील सर्वसामान्य मतदार सुद्धा बागल यांच्याकडे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून पाहत आहेत असे ढेरे यांनी सांगितले.
