अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा देवळालीत आनंदोत्सव साजरा

करमाळा प्रतिनिधी. अयोध्या येथील राम मंदिर भूमीपूजनाच्या निमिताने देवळाली ता.करमाळा येथे नागरीकांना लाडू वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड यांनी कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,बाळासाहेब गायकवाड, चैतन्य राखुंडे, सुशांत कुलकर्णी ,पांडुरंग जगताप, मच्छिंद्र गायकवाड, लक्ष्मण माळी,अमोल गोसावी, भास्कर गायकवाड ,कांतीलाल मोरे, दत्ता सुर्वे, कालिदास गुंड, ब्रह्मदेव गुंड, भारत गुंड, भरत गुंड, विष्णू मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
