Monday, April 21, 2025
Latest:
आरोग्यकरमाळासकारात्मक

सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायामाचा प्रकार असून तणावाच्या प्रसंगी आपले शारीरिक मानसिक बळ वाढवतो- सौ.सुनीता देवी

करमाळा प्रतिनिधी सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायामाचा प्रकार असून तणावाच्या प्रसंगी आपले शारीरिक मानसिक बळ वाढवतो असे मत गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका सौ सुनीता देवी यांनी व्यक्त केले. अर्बन बॅंकेचे चेअरमन देवी गटाचे नेते कन्हैयालाल गिरधरदास देवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार महायज्ञ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्य नमस्कार यज्ञाचा प्रारंभ दिनांक १२/८/२०२२ वार शुक्रवार रोजी सूर्योदयास सकाळी 6.18वा सुरू झाला व सांगता सूर्यास्तास सायंकाळी ७.०२ वा झाली . यावेळी गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या खजिनदार सुनीता कन्हैयालाल देवी मॅडम, अनुज कन्हैयालाल देवी, नॅशनल चॅम्पियन .विशाल जाधव यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून उपक्रमास सुरुवात झाली. या वेळी व्यक्त केलेल्या मनोगतात सौ. सुनीता कन्हैयालाल देवी म्हणाल्या या काळात खेळापासून व्यायामा पासून दूर गेलेले मुलांची पिढी साठी हा व्यायामाचा प्रकार उपयुक्त आहे म्हणून सूर्यथाँन या नावाने प्रशालेत दरवर्षी हा उपक्रम राबवला जाईल.”उपक्रमात पतंजली योग समितीचे राजेंद्र वाशिंबेकर , हनुमान सिंह परदेशी विद्या विकास संस्थेचे विलास घुमरे सर, कलीम काझी सर, फंड सर कॉन्ट्रॅक्टर पाटील, नगरसेवक महादेव फंड, प्रवीण जाधव,अतुल फंड,गणेश करे पाटील,प्रकाश क्षिरसागर, अमर करंडे , साबीर तांबोळी ,मयूर देवी,कमलाई नगरी साप्ताहीक पेपरचे संपादक जयंत दळवी, ललिता वांगडे, भाग्यश्री वांगडे आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला नवभारत इंग्लिश स्कूल व श्री गिरधरदास देवी विद्यालयाच्या 670 विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी सहभाग घेऊन 47212 सूर्यनमस्कारांची योगदान दिले.वरील सर्व उपक्रमाचे आयोजन श्री गिरधरदास देवी विद्यालय व नवभारत इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group