वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवराज झोळ यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर – 12 सप्टेंबर 2025वाशिंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी शांततेत पार पडली. या निवडीत श्री. शिवराज झोळ यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच तानाजी बापू झोळ होते. उपसरपंचपदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने, सभागृहातील एकमताने श्री. शिवराज हनुमंत झोळ यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर श्री. झोळ यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.या वेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंचपदी एका तरुण व सक्रिय व्यक्तीची निवड झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून, सर्वत्र शिवराज झोळ यांचे अभिनंदन होत आहे.


