स्वराज्य सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारने सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना सन्मान
करमाळा प्रतिनिधी स्वराज्य सरपंच सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारने सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना सन्मानित करण्यात आले.
३०/७/२०२३ रोजीअहिल्यानगर येथे माऊली संकुल सभागृह सावडी रोड येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने आदर्श सरपंच माननीय श्री भास्करराव पेरे पाटील आणि हवामान अभ्यासक मा.पंजाबराव डख यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि मिडल देऊन सन्मानित करण्यात आले. आपले सामाजिक कार्य निस्वार्थ भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत गावाचा विकास आणि अवैध्य दारू गुटखा जुगार बंदीसाठी ठराव,शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलासा तसेच वृक्ष लागवडी सह विविध योजना राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच सामाजिक कार्यातील आपले योगदान कामाप्रती असलेले बांधिलकी सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी आपण केलेले काम इतरांना देखील प्रेरणादायी ठरणारे आहे.
या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, संस्थापक बाबासाहेब पावशे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार ,राज्य संपर्कप्रमुख अमोल शेवाळे ,संघटक रवींद्र पवार ,विश्वस्त सुजाता कासार तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
