हिंदुसुर्य महाराणा प्रताप जयंती निमित्ताने राजपूत समाज करमाळाच्या आयोजित रक्तदान शिबिरात १३० दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान.
करमाळा प्रतिनिधी- हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त रविवारी सकल क्षत्रिय राजपूत समाज करमाळाद्वारा आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तप्रतिसाद मिळाला आहे. शहरातील मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे सकाळी १० वाजता उद्घाटन झाले. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या शिबिरात सर्वधर्मीय तब्बल १३० जणांनी स्वयंफुर्तीने रक्तदान केले. रक्तदात्यांत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
करमाळा शहरातील श्री कमलाभवानी ब्लड बँकेने या शिबिराचे रक्तसंकलन केले. राज्यभरातील ऐन रक्त टंचाईच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सकल राजपूत समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाल्याने श्री कमलाभवानी ब्लड बँकेचे श्री. निलेश पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
