राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिम्मित हिवरवाडी विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनीधी- हिवरवाडी तालुका करमाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त हिवरवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दिनांक ३०/५/२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ रक्तदान शिबिर तसेच त्याच दिवशी सायंकाळी ६ ते १० भव्य खुल्या डांन्स स्पर्धा १००००/- रुपये प्रथम बक्षीस व ट्राँफी, ७०००/- रुपये व्दितीय बक्षीस व ट्राँफी, ५०००/- रुपये त्रुतिय बक्षीस व ट्राँफी .सौजन्य- राजमाता ग्रुप हिवरवाडी. तसेच बुधवार दिनांक ३१/५/२०२३ रोजी सकाळी ६ ते ८ वाजता रांगोळी स्पर्धा (मुलींसाठी) बक्षीस आकर्षक भेट वस्तू , तसेच बुधवार दिनांक ३१/५/२०२३ रोजी सायंकाळी ५ ते १० वाजता भव्य मिरवणूक निघणार असून तरी वरील सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती राजमाता ग्रुप हिवरवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
