पोलिस भरती उमेदवारी अर्जासाठी सर्व्हर डाऊनची समस्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मुदतवाढीची सचिन खराडे यांची मागणी
केत्तुर प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, अर्ज करण्याची वेबसाईट सतत हँग होणे, दिवसा आणि रात्रीही सर्व्हर डाऊन असणे .अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असून, अजूनही अनेकांचे अर्ज करणे रखडले आहे.अनेक उमेदवारांचे फार्म नजरचुकीने चुकले आहेत.त्या सर्व उमेदवारांना दिलासा देण्यासाठी ५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी सचिन खराडे संघटन सरचिटणीस- भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका (अ.जा मोर्चा) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
