Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

बहुजन विकास संस्थेकडून समाज हिताचे कार्य : ऍड. नईम काझी

करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील न्यू इरा इंग्लीश स्कूल येथे बहुजन विकास संस्थेमार्फत लेजर खतना कॅम्पचे आयोजित करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमा प्रसंगी उद्घाटक ऍड. नईम काझी बोलत होते. या खतना कॅम्पमध्ये ४१ मुलांची खतना सोलापूरचे सुप्रसिद्ध खतना स्पेशालिस्ट डॉ. नसीर सय्यद यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना मोहसीन शेख, मौलाना तोहीद शेख, हाफिज अन्वर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना ऍड. काझी म्हणाले कि, खतना हि इस्लाम धर्मातील प्रमुख सुन्नत आहे. ती करण्यासाठी प्रत्येकाला सोलापूर या ठिकाणी जावे लागते. त्यात सर्वसामान्य लोकांना मोठा खर्च येतो. परंतु बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण यांनी लेजर खतना कॅम्पचे आयोजित करून लोकांना मोठा दिलासा दिला आहे. बहुजन विकास संस्थेमार्फत वेळोवेळी समाज हिताचे कार्य निरंतरपणे चालू असते अशा समाज हिताचे कार्य लोकसहभागातून करण्याची गरज असल्याचे मत काझी यांनी सांगितले.या खतना कॅम्पला नगरसेवक संजय सावंत, छत्रपती क्रांती सेनेचे संयोजक आर आर पाटील, आड महादेव कांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मन भोसले, अनिसचे कार्याध्यक्ष अनिल माने, सावंत गटाचे नेते सुनील सुनील सावंत, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, बामसेफचे अरुण माने, दीपक भोसले, दिनेश माने, गौतम खरात, हाजी इस्माईल पठाण, हाजी मुहम्मद बागवान, हाजी उस्मान सय्यद, जमीर सय्यद, एम एस कांबळे, जावेद आत्तार, पत्रकार अश्पाक सय्यद, अलीम शेख, राजू सय्यद आदी मान्यवरांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी खतना कॅम्पमध्ये आलेल्या मुलांना जेलर समीर पटेल, राजू बागवान, मोहसीन नालबंद, अन्सार बागवान, हाजी शकील बागवान, शौकत शेख, हरून शेख, विजय सुपेकर, इस्माईल शेख, वेस्टर्न बेकरी आदींनी खाऊ वाटप केला.खतना कॅम्प यशस्वी करण्यासाठी कय्युम शेख, अजीम मोगल, जमीर मुलाणी, दस्तगीर पठाण, मुबीन बागवान, अमीर मोमीन, अशरफ तांबोळी, बबलू पठाण, तोफिक शेख, अमीन बेग, अकबर सय्यद, सलीम पिंजारी, चांद शेख, शहाजहान शेख, अलीम बागवान आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कय्युम शेख यांनी केले. प्रस्तावना इसाक पठाण यांनी केले तर आभार अजीम मोगल यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group