करमाळा तालुका क्रीडा संकुलला आ. संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार टेबल टेनिस साहित्य उपलब्ध.
करमाळा प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यात जीन मैदान येथे क्रीडा संकुल ची इमारत आहे. या इमारतीमध्ये एक बॅडमिंटन हॉल आहे तर त्या शेजारीच दुसरा टेबल टेनिस साठी हॉल आहे. परंतु टेबल टेनिस चे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे शहरातील अनेक खेळाडूंची त्यामुळे कुचंबना होत होती. याविषयी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने यांचे नेतृत्वाखाली सचिन साखरे, सुदेश भंडारे, विठ्ठल भणगे, बाळासो बागडे, मोरेश्वर पवार व अनुप खोसे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन देऊन करमाळा तालुका क्रीडा संकुल ला टेबल टेनिसचे साहित्य उपलब्ध करून देणे विषयी विनंती केली होती.
सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आ. संजयमामा शिंदे यांनी तालुका क्रीडा अधिकारी मोरे यांना संबंधित टेबल टेनिस साहित्य उपलब्ध करून देणे विषयी सूचना केलेली होती. त्या सूचनेनुसार टेबल टेनिस साहित्य उपलब्ध झालेले असून ते क्रीडा संकुलच्या टेबल टेनिस हॉलमध्ये बसविण्यात आलेले आहे. याचा लाभ तालुक्यातील व शहरातील खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन क्रीडा अधिकारी मोरे यांनी केले आहे .
चौकट –
करमाळ्यातील बऱ्याच लोकांची टेबल टेनिस खेळण्याची इच्छा असूनही गैरसोय होत होती. याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली याचे समाधान आहे. या टेबल टेनिस च्या साहित्यामुळे नवीन पिढीला टेबल टेनिस विषय आकर्षण तयार होईल त्यातून त्यांना प्रोत्साहनही मिळेल व नवनवीन अधिकाधिक खेळाडू तयार होण्यास मदत होईल असा विश्वास प्राचार्य नागनाथ माने यांनी बोलून दाखविला.
