मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सोमवारी करमाळ्यात मेळावा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप होणार-महेश दादा चिवटे
करमाळा (प्रतिनिधी )
संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या या योजना संपूर्ण तालुक्यातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करमाळ्यात आयोजित केला असून या मेळाव्याला तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
महिलांना 50 टक्के दरात एसटी प्रवास ,दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत,दर महिन्याला पंधराशे रुपये अनुदान
उच्च शिक्षणापर्यंत सर्व मुलींना मोफत शिक्षण ,महिला बचत गटांना बिगरव्याजी कर्ज 65 वर्षावरील वृद्ध पुरुष स्त्रियांना उपचारासाठी दरवर्षी 3000 रुपयाची वय श्री योजना या सह महिलांसाठी शेकडोयो योजना आणल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून हा आनंद देखील द्विगुणीत करण्यासाठी सोमवारी या मेळाव्याची आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी संपर्कप्रमुख संजय मशिनकर
युवा सेनेचे सचिव किरण साळी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,युवा सेना मराठवाडा संपर्कप्रमुख बाजीराव सिंघम शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे
संपर्कप्रमुख महेश साठे जिल्हाप्रमुख चरण चौरे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील,माजी उपमहापौर दिलीप कोल्हे सोलापूर शहर प्रमुख मनुष शेजवाल युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे महिला संपर्कप्रमुख अनिता माळगे आधी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.यावेळी ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉक्टर श्रद्धा जवळ कॅन्सर वरील मोफत उपचाराची माहिती देणार आहेतयावेळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील राहुल कानगुडे संजय शीलवंत सुरेश करचे माधव सूर्यवंशी नवनाथ गुंड नागेश शेंडगे ज्योतीताई शिंदे निलेश राठोड एडवोकेट शिरीष लोणकर संजय जगताप निलेश चव्हाण प्रदीप बनसोडे राजेंद्र मिरगळ आजिनाथ इरकर बाबा तोरणे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
+++++
शिवसेनेच्या महिला आघाडी तर्फे बचत गट व बांधकाम कामगार असंघटित रोजंदारीने काम करणाऱ्या महिला याची नोंदणी सुरु असून तालुक्यातील प्रत्येक महिलेला शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी शिवसेनेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आल्या असून याचीही उद्घाटन शिवसेना युवा सेनेचे सचिव किरण साळी यांच्या हस्ते होणार आहेत.
