परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तेली गल्ली करमाळा यांच्यावतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांना, सेवेकरी यांना कळविण्यात येते की श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य गुरुपुत्र आदरणीय श्री. चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील अत्यंत महत्त्वाचा असलेला गुरु पौर्णिमा महोत्सव 2024 हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तेली गल्ली करमाळा येथे दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. यामध्ये सकाळी आठची श्री स्वामी समर्थ महाराजांची भूपाळी आरती तसेच महाराजांच्या मूर्तीची पूजा व अभिषेक, त्यानंतर साडेदहाची महानैवेद्य आरती व सायंकाळी सहाची महानैवेद्य आरती संपन्न होणार आहे. अभिषेक झाल्यानंतर ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे गुरु पद घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथांचे सामुदायिक पठण होणार आहे. तसेच विवाह नोंदणी, बेरोजगार नोंदणी ,प्रश्नोत्तरे सेवा, त्रिकाल आरत्या, मार्गदर्शन असे विविध उपक्रम व ग्रंथ पठण सेवा संपन्न होणार आहेत.
महाराजांचे गुरुपद घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.गुरूपद घेतले कि वर्षभर महाराज आपला योगक्षेम चालवतात तरि कोणीही हि संधी सोडू नये.जास्तीत जास्त सेवेकरी यांनी या सेवेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गणेश नगर, तेली गल्ली व रंभापुरा करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
