आध्यात्मिककरमाळा

परमपूज्य गुरूमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने चंद्रकांत दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखलठाण यांच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन

 .

 

करमाळा प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित चिखलठाण केंद्र आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव दि.२१ जुलै रविवार रोजी त्रिकाळ आरती सेवा सहीत साजरा केला जाणार आहे… तरी सर्व चिखलठाण गावकरी सेवेकरी यांनी या उच्च कोटीचा सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता भुपाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाअभिषेक षोडशोपचार पूजा १०.३० वाजता महानैवेद्य आरती मार्गदर्शन…. गुरुपद देण्यासाठी चालू दिवसभर अखंड श्री स्वामी समर्थ जप… श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ ६ वाजता महानैवेद्य आरती कार्यक्रम संपन्न…महाराजांचे गुरुपद घेण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.गुरूपद घेतले कि वर्षभर महाराज आपला योगक्षेम चालवतात तरि कोणीही हि संधी सोडू नये.जास्तीत जास्त सेवेकरी यांनी या सेवेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखलठाण करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group