करमाळा

आषाढी वारी निमित्त करमाळा आगाराचे कार्य कौतुकास्पद- प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख करमाळा


करमाळा प्रतिनिधी:- पंढरपूर येथे उद्या रविवारी आषाढी वारी निमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी करमाळा शहर हद्दीतून जात असतात अशा भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करमाळा आगार प्रमुख होनराव व आगारातील कर्तव्यदक्ष अधिकारी अभिजीत पाटील व त्यांच्या त्यांच्या सर्व सहकारी यांनी उत्तम कार्य केले आहे. मध्यंतरी जिल्हाप्रमुख आरती बसवंती व तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी अगाराची पाहणी करून आगार प्रमुखांना त्रुटी कळविल्या होत्या. त्यातील बहुतांश त्रुटींची पूर्तता झाली आहे. सध्या आषाढी वारी निमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर येथून येणाऱ्या असंख्य एस टी ला आवश्यक तेवढा डिझेल पुरवठा करमाळा आगाराने केला आहे तसेच ज्या गाड्यांची किरकोळ दुरुस्ती असेल ती सुद्धा तत्काळ दुरुस्त करून भाविकांचा प्रवास सुखकर केला असल्याने शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आगार प्रमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!