करमाळा भाजप शहराध्यक्षपदी जगदीश अगरवाल तर सरचिटणीसपदी नितीन झिंजाडे व आजिनाथ सुरवसे यांची निवड
*
करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे यांच्या उपस्थितीत करमाळा भाजप मंडळाच्या प्रमुख पदांवर नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली.शुक्रवार,. ४ जुलै २०२५ रोजी करमाळा येथील भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपा करमाळा शहराध्यक्षपदी जगदीश अगरवाल,तर करमाळा मंडल सरचिटणीसपदी नितीन झिंजाडे आणि आजिनाथ सुरवसे यांची निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी श्री गणेश चिवटे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री जयकुमार गोरे,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह गोरे यांच्या नेतृत्वात आपण काम करत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेष लक्ष घालून कार्यकर्ता आणि जनतेशी घट्ट संपर्क ठेवून भारतीय जनता पार्टीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट करून भाजपचे संघटनात्मक बळ वाढवण्याचा त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संकल्प करण्यासाठी प्रोत्साहित केले,
निवडीनंतर सर्व नवनियुक्त सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी सांगितले की, “भाजपच्या विचारसरणी प्रती निष्ठा ठेवत, पक्ष संघटन बळकट करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार आहे.यावेळी “शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल म्हणाले की, हे पद केवळ जबाबदारी नसून जनतेच्या विश्वासाचं प्रतिक आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास पेलण्यासाठी माझं काम पारदर्शक, जनहिताची दृष्टी ठेवून असेल यामुळे करमाळा शहरात भाजपा अधिक मजबूत होईल तसेच नूतन सरचिटणीस आजिनाथ सुरवसे म्हणाले की,”भाजप मंडल सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे , बंडू शिंदे , अमोल पवार, सोमनाथ घाडगे, पञकार दिनेश मडके, संतोष कुलकर्णी, हर्षल शिंगाडे , संजय जमदाडे , किरण बागल ,प्रवीण बिनवडे , संदीप काळे , भैयाराज गोसावी, प्रकाश ननवरे, कपिल मंडलिक, राजू सय्यद, गणेश माने, नानासाहेब अनारसे, कमलेश दळवी, शैलेश राजमाने, सचिन कानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते


