Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत भाजप महायुती उमेदवारांना विजयी करा-दादासाहेब येडे

करमाळा प्रतिनिधी- जिल्हा परिषद पंचायत समिती करिता कोर्टी जिल्हा परिषद गटातील भाजपा- राष्ट्रवादी व मित्रपक्ष युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान भाजपा किसान मोर्चा मा प्रदेश चिटणीस तथा धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश उपाध्यक्ष श्री दादासाहेब येडे यांनी केले आहे कोर्टी जिल्हा परिषद गट व केतुर व कोर्टी पंचायत समिती गणामध्ये अनेक प्रश्न आजपर्यंत मार्गी लावले आहेत व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटातुन उभे असणारे सर्व उमेदवार होतकरू आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या भागासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू व शासन दरबारी याचा पाठपुरावा करून भागाचा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून पश्चिम भागातील रस्ते पाणी वीज रेल्वे उजनी बॅक वॉटर चे प्रश्न मार्गी लागून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या भागातील शेतकरी सुखी झाला पाहिजे असे मत येडे व्यक्त केले यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख ऍड विकास जरांडे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल जरांडे हे ही उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!