करमाळ्यात उद्या 11 फेब्रुवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने मोफत सर्व धर्मीय 21 सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात उद्या (शनिवारी) सर्वधर्मीय विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये एक बौद्ध धर्मीय व २० हिंदू धर्मीय विवाह होणार आहेत. यासाठी साधारण १५ हजार वऱ्हाडी येणार असल्याचा अंदाज असून त्यांची सर्व तयारी प्रतिष्ठान केली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे.
गणेश चिवटे म्हणाले, श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने होत असलेल्या विवाह सोहळ्यात 21 विवाह होणार आहेत. यात एक विवाह हा बारामती येथील असणार आहे. नोंदणी केलेल्या वधू- वरांमध्ये एक बौद्ध धर्मीय लग्न विवाह असणार आहे. यातील सर्व ‘वरां’च्या परण्यासाठी घोड्याची व्यवस्था केली आहे. वधूसाठी सर्व मेकअप साहित्य देण्यात येणार आहे.परण्यामध्ये आकर्षक आतिषबाजी बॅन्जो व हलगी असणार आहे. विवाहस्थळी सुसज्ज मंडप व आकर्षक डेकोरेशन करण्यात आले आहे. सर्व वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबर ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आहे. विवाहस्थळी दक्षता म्हणून रुग्णवाहिका व अग्निशमनची गाडी ठेवण्यात आली आहे. येथे स्वच्छतागृहाचीही व्यवस्था असणार आहे. वर्हाडी मंडळीसाठी सकाळी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोजन व्यवस्था असणार आहे.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, आजिनाथ सुरवसे, दासाबापू बरडे, विजयकुमार नागवडे, विनोद महानवर, नाना अनारसे, जयंत काळे पाटील, नितीन चोपडे व श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
