केत्तुरचे नेताजी सुभाष विद्यालयाचे पाच विद्यार्थी एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीसाठी पात्र.
केत्तूर (अभय माने ) नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर (ता .करमाळा) येथील विद्यार्थ्यी एन.एम.एम.एस. परीक्षेच्या 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे-
कुमारी त्रिवेणी नवनाथ देवकते,कुमारी स्नेहल नितीन गावडे,अभिषेक किसन भिसे ,हर्षवर्धन नागनाथ पांढरे ,रणजीत लक्ष्मण कोकणे
या परीक्षेस विद्यालयातील 21 विद्यार्थी बसले होते. पैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर त्यापैकी वरील पाच विद्यार्थ्यी एन. एम.एम. एस .शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.ए.मुलांणी विषय शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले आहे.