Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

कुंभेज येथील ग्रामपंचायत सदस्यांचा आ. संजयमामा शिंदे गटात जाहीर प्रवेश

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांच्या गटांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे .रस्ते ,वीज, पाणी आदी मूलभूत प्रश्न आ. संजयमामा शिंदे सोडवत असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. यापूर्वीच माजी आ.नारायण पाटील आणि माजी आ. बागल यांच्या गटामधून झरे चे सरपंच प्रशांत पाटील, देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड, फीसरे चे सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके ,शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत अवताडे ,नेरलेतील काकासाहेब पाटील व वडार समाज , केतुर नंबर 2 चे एड. अजित विघ्ने, राजुरी चे आर आर बापू साखरे या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात यापूर्वीच प्रवेश केलेला आहे.
मंगळवार दिनांक 29/ 3/ 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता कुंभेज ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्री अण्णासाहेब साळुंखे यांचेसह रणजीत कादगे, बबन कन्हेरे या ग्रामपंचायत सदस्यांसह उद्योजक महावीर शेठ साळुंखे व कुंभेज येथील असंख्य कार्यकर्ते माजी आमदार नारायण पाटील गटातून आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.
सदर कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता संपन्न होईल. सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ कुंभेज तसेच जनसेवा नवरात्र उत्सव मंडळ कुंभेज व समस्त ग्रामस्थ कुंभेज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group