करमाळा शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संविधान दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरांमध्ये संविधान दिनानिमित्त शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण ,दिनेश मेहेर, संतोष कांबळे, स्वप्नील टेके, महादेव गोसावी, महेश गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते .


