करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मनसेचे नानासाहेब मोरेची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याची तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करण्यात आले असुन करमाळा तालुक्यातील शेतकरी अद्याप मदतीपासुन वंचित आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मद्रुंप या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे परंतु करमाळा तालुक्याला यामधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. . अतिवृष्टीने करमाळा तालुक्यातील तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात आले असून शासनाला त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे शासनाकडून लवकरच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार आहे याबाबत आमचा पाठपुरावा चालू असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला नक्की मदत मिळणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले आहे. समीर तहसीलदार करमाळा.