पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश बाबुराव कुटे यांचे दुःखद निधन
करमाळा प्रतिनिधी खडकपुरा गल्ली येथील रहिवासी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी श्री .रमेश बाबूराव कुटे (वय ६ ८ ) यांचे अल्पशा आजाराने सात जुलैला दुःखद निधन झाले असुन त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी एक मुलगा सुन चार मुली जावई नातवंडे दोन भाऊ भावजय पुतणे चार बहिणी असा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते प्रविण कुटे यांचे वडील व पत्रकार दिनेश मडके यांचे ते मामा होते. सुरेश कुटे सर व चित्रकार आर्टीस्ट चंद्रकांत कुटे यांचे थोरले बंधू होते . प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टींगचे पालन करून त्यांच्यावर विकासनगर करमाळा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे कुटेदादा म्हणुन ते परिचित होते.त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

