करमाळा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संभाजी शिवाजी पाटील या रुग्णास पन्नास हजार रूपयाची आर्थिक मदत

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जि.काँग्रेस आयचे माजी उपाध्यक्ष विजयराव पवार यांच्या माध्यमातून व करमाळा ता.सहकक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शिवकुमार चिवटे यांच्या पाठपुराव्यामुळे*मुख्यमंत्री सहायता निधीमधून संभाजी शिवाजी पाटील रा.बार्शी जिल्हा सोलापूर या रुग्णास पन्नास हजार रुपयाची वैद्यकीय आर्थिक मदत दिनांक १९/०१/ २०२४ रोजी मंजुर झाली. सदरील रूग्ण हे चंदन न्यूरो सायन्सेस हॉस्पिटल, सोलापूर या रुग्णालयात मेंदू रोग शस्त्रक्रियाच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते ही माहिती पेशंटचे नातेवाईक व काँग्रेस आयचे सोलापूर जि. माजी उपाध्यक्ष विजयराव पवार यांनी सहकक्षप्रमुख करमाळा ता. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शिवकुमार चिवटे यांना दिली.यावेळी शिवकुमार चिवटे यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक जितेश देशमुख सर यांच्याकडे संपर्क साधुन मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदरील रुग्णाच्या शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत पन्नास हजार रुपये मिळवून दिली. या बद्दल रुग्णाचे वडील शिवाजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे सर, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मा रामहरी राऊत सर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे रविंद्र ननावरे सर,मुख्यमंत्री सहायता निधीचे जितेश देशमुख सर, सहकक्षप्रमुख करमाळा ता.शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे शिवकुमार चिवटे आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे संपूर्ण टीम यांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group