करमाळा तालुका बीट स्तरीय स्पर्धेत घारगाव शाळेचे घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा साडे या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या शाळेने मोठा गट कबड्डी मुले यात अंतिम विजय मिळवला सदर अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव यांच्यात लढत झाली या लढतीत घारगाव शाळेने सात गुणांनी विजय मिळविला तसेच बुद्धिबळ मोठा गट स्पर्धेत इयत्ता सहावीतील विद्यार्थी सुमित बिभीषण बारस्कर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला या कामी घारगाव शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व क्रीडा शिक्षक श्री विलास चव्हाण सर यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ घारगाव यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे घारगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी सरवदे यांनी फोन द्वारे केले सर्वांचे अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा .
