करमाळा शहर व तालुक्यात गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी बारा कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 102

करमाळा प्रतिनिधी गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी करमाळा शहर व तालुक्यातील अॅन्टीजीन टेस्ट घेण्यात आल्या असून दिनांक 30 जुलै रोजी शहरातील घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये 10 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये कानाडगल्ली येथील सहा कोऱोना पाॅझिटीव्ह असुन यामध्ये तीन महिला व तीन पुरुषाचा समावेश असुन डॉ.आंबेडकर चौक पुतळ्याजवळ दोन पुरुष ,सुतारगल्ली येथील एक पुरुष व खडकपुरा येथील एक महिला कोरोना पाॅझिटीव्ह असुन शहरात एकुण 10 कोरोना रुग़्ण आढळले आहेत. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात दोन कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये आळसुंदे 1 व जेऊर 1 यांचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.
आज ६ जण घरी सोडले असुन एकुण २९ घरी गेले आहेत.एकुण रुग्ण १०२ (मिळालेल्या आकडेवारी) नुसार आहेत.

