बकरी ईदची नमाज पठण यावर्षी घरातच अदा करण्याचे
हाजी उस्मानशेठ तांबोळी. यांचे आवाहन.

करमाळा प्रतिनिधी
मुस्लिम समाजाचा पवित्र सण बकरी ईद येत्या एक ऑगस्ट रोजी असुन सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ची नमाज पठण घरातच अदा करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशन प्रांतिक अध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे.
यावेळी तांबोळी म्हणाले की कोरोना या महामारी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गेल्या चार महिने पासून प्रयत्न करत आहे अद्याप पर्यंत कोरोना वर लस मिळालेली नाही गेल्या चार महिने पासून लाॅकडाऊन असल्यामुळे कोणी ही मुस्लिम बांधव मशीदीत न जाता आप आपल्या घरात नमाज अदा करत आहेत. त्याच प्रमाणे बकरी. ईदची नमाज पठण सुध्दा घरातच अदा करावी तसेच बकरी ईदसाठी शासनाने बकरे खरेदी साठी सोशल डिसटेंशन ठेवून बाजार उपलब्ध करून दयावा. यावेळी शासनाने शक्यतो प्रतिबंधात्मक कुर्बानी करा असे सुचवले आहे परंतु प्रतिबंधात्मक कुर्बानी इस्लाम धर्मामध्ये मान्य नाही त्यामुळे शासनाने कुर्बानी वर कुठलेही निर्बंध लावु नये. गेल्या चार महिने पासून लाॅकडाऊन चालू असुन हिंदू मुस्लिम समाजातील अनेक सण आले आहे परंतु सर्व सण जयंती शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून साजरे केले आहेत.त्यामुळे शासनाने आता लाॅकडाऊन शिथील करावे नागरिकांना कोरोना या आजाराचे महत्त्व कळालेले असुन सर्व नागरिक मास्क. सॅनिटायझरचा वापर करत असुन प्रशासनास सहकार्य करत आहेत. आता शासनाने हळूहळू निर्बंध हटवावे असे उस्मानशेठ तांबोळी यांनी सांगितले आहे
